सिडनी : ऑस्ट्रेलियाचा धडकाकेबाज फलंदाज फिलिप ह्युजेस याचं अखेर निधन झालं आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमसह क्रीडा विश्वाला मोठा हादरा बसला आहे.
धडकाकेबाज फलंदाज फिलिप ह्युजेस यांच्या डोक्यावर बॉल आदळल्यानं तो मैदानावरच कोसळला होता. हेल्मेट असताना सुद्धा तो जायबंदी झालाय. त्याची स्थिती गंभीर होती, अखेर त्याला मृत्यूसमोर हार मानावी लागली.
टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ सज्ज होता. मात्र, ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे.
सिडनी क्रिकेट ग्राउंडवर शेफिल्ड शिल्ड स्पर्धेदरम्यान, ऑस्ट्रेलियने फलंदाज फिलिप ह्युजेस यांच्या डोक्यावर बॉल लागला, गंभीर जखमी ह्युजेसच्या डोक्यावरनं शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानंतर तो कोमात गेला आणि आज अखेर फिल ह्युजेस जग सोडून गेलाय.
ऑस्ट्रेलियन टीमच्या डॉक्टरांनी दिलेली माहिती
डोक्याला बाऊन्सर बॉल लागल्याने जखमी झालेल्या, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर फिलीप ह्यूजचं अखेर निधन झालंय.
ऑस्ट्रेलियन टीमचे डॉक्टर पीटर बुकनर यांनी याविषयी माहिती देतांना म्हटलंय, मला हे सांगतांना अतिशय दु:ख होतंय की फिलिप ह्यूज आपल्याला सोडून गेलाय.
ब्रुकनर यांनी दिलेल्या माहितीनुसार हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर फिलिप ह्युज कधीही शुद्धीवर आला नाही.
निधनाआधी ह्युजचे नातेवाईक आणि जवळचे मित्र त्याच्या जवळ उभे होते. आमच्या संवेदनायावेळी त्याच्या परिवारासोबत आहेत.
ह्यूजने २००९ पासून २०१३ पर्यंत २६ कसोटी सामने खेळले.
शेफील्ड शील्डच्या एका सामन्या दरम्यान दक्षिण ऑस्ट्रेलियासाठी खेळतांना ह्यूजच्या हेल्मेटला, न्यू साऊथचा बॉलर शॉन एबॉटचा वेगवान बॉल लागला.
जखम झाल्यानंतर ह्यूजने गुडघे टेकून खाली बसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तोल सांभाळतांना तो खाली पडला.
ह्यूजला स्ट्रेचरने उचलून मैदानाबाहेर नेण्यात आलं, यानंतर हॉस्पिटलात नेऊन सर्जरी करण्यात आली. हॉस्पिटलात नेण्याआधी ह्यूजला तोंडावाटे श्वास देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
ह्यूजने आपला सहकारी खेळाडू एस्टर एगर सोबत २०१३ मध्ये इंग्लड विरोधात दहाव्या विकेटसाठी १६३ धावांची भागीदारी केली होती.
सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये सुरू असलेल्या शेफ़ील्ड शील्ड माकिलेचा हा सामना रद्द करण्यात आला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.