मुंबई : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या पांड्या बंधूंना अच्छे दिन आले आहेत. हार्दिक पांड्या आणि कुणाल पांड्या या दोन्ही भावांनी मुंबईमध्ये घर घेतलं आहे. अंधेरीतल्या वर्सोवा भागामध्ये या दोघांनी टू बेडरूम किचनचा फ्लॅट घेतला आहे.
एशियन एज या वृत्तपत्रानं ही बातमी दिली आहे. पांड्या बंधूंच्या वडिलांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे. माझ्या मुलांनी स्वकमाईतून हे घर घेतलं आहे. मुंबईतलं हे आमचं पहिलंच घर असल्यामुळे मी आनंदी असल्याचं वडिल म्हणाले आहेत.
आयपीएलच्या दहाव्या मोसमामध्ये कोलकाताविरुद्धच्या मॅचमध्ये खेळताना पांड्या बंधूंनी उल्लेखनीय कामगिरी करत मुंबईला मोसमातला पहिलाच विजय मिळवून दिला होता. हार्दिक पांड्यानं शेवटच्या ओव्हरमध्ये फटकेबाजी करत मुंबईला जिंकवून दिलं तर कुणाल पांड्यानं कोलकात्याच्या तीन विकेट घेतल्या.