पाकिस्तानचा कामरान अकमल नाराज

पाकिस्तानचा विकेटकीपर आणि बॅट्समॅन कामरान अकमलने पाकिस्तानच्या संघ व्यवस्थावनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. उमर अकमलवर भेदभावाची वागणूक मिळत असल्याचा आरोप केला आहे. 

Updated: Apr 10, 2015, 04:55 PM IST
पाकिस्तानचा कामरान अकमल नाराज title=

कराची : पाकिस्तानचा विकेटकीपर आणि बॅट्समॅन कामरान अकमलने पाकिस्तानच्या संघ व्यवस्थावनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. उमर अकमलवर भेदभावाची वागणूक मिळत असल्याचा आरोप केला आहे. 

कामरान अकरमनं आपला छोटा भाऊ उमर अकमलला आगामी बांगलादेश दौऱ्यात संधी न दिल्याबद्दल  पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर नाराजी व्यक्त केली आहे. अहमद शहजादलाही फक्त ट्वेंटी-२० टीममध्ये घेण्यात आले आहे. 

पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह-उल-हक आणि कोच वकार युनूसनं अहमद आणि उमरच्या खराब वागणूकीबद्दल तक्रार केली होती. कामरान अकमलनं सांगितले की, पाकिस्तान टीम व्यवस्थापनानं उमरचं करिअरच खराब केलं आहे. उमरनं वैयक्तिक जीवन क्रिकेटपासून वेगळं ठेवलं आहे. जर युवा खेळाडूंच्या वागणूकीबाबत समस्या असतील तर, व्यवस्थावनानं या खेळाडूंना योग्य मार्गदर्शन करावं.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.