अखेर विराटनं सोडलं मौन, म्हणाला टीकाकारांना लाज वाटली पाहिजे

वर्ल्डकपमधील भारताच्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट फॅन्सनी सोशल मीडियावर विराट कोहली आणि अनुष्का शर्मावर शाब्दिक आक्रमण केलं होतं. मात्र या सगळ्यावर विराटनं कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र त्यानं आता हे मौन सोडलंय.

Updated: Apr 10, 2015, 03:57 PM IST
अखेर विराटनं सोडलं मौन, म्हणाला टीकाकारांना लाज वाटली पाहिजे title=

नवी दिल्ली : वर्ल्डकपमधील भारताच्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट फॅन्सनी सोशल मीडियावर विराट कोहली आणि अनुष्का शर्मावर शाब्दिक आक्रमण केलं होतं. मात्र या सगळ्यावर विराटनं कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र त्यानं आता हे मौन सोडलंय.

  
इतके दिवस गप्प राहून सर्व सहन करणाऱ्या विराटनं यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'चाहत्यांच्या या वागण्यामुळे मी अतिशय दुखावलो गेलो आहे. त्यांना त्यांच्या वागण्याबद्दल लाज वाटली पाहिजे' अशी निराशाजणक प्रतिक्रिया विराटनं दिली आहे. 

'या घटनेमुळं मी खूप निराश झालो आहे. त्या सामन्यापूर्वी मी सातत्यानं चांगली कामगिरी केली होती, मात्र फक्त एका सामन्यातील अपयशामुळं माझ्यावर एवढी टीका व्हावी हे योग्य नाही. त्या सामन्यानंतर आलेल्या प्रतिक्रियांमुळं मला फार वाईट वाटलं, असं सांगत त्यानं दु:ख व्यक्त केलं आहे. 

या सेमीफायनल मधील सामन्यात कोहली केवळ १ रन करून बाद झाला होता. तसंच भारतानं हा सामना ९५ रन्सनी गमावला होता.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.