मुंबई : पी. व्ही. सिंधू आता हे नाव सा-या भारतीयांच्या तोंडी असेल. कारण भारताच्या या कन्येनं इतिहास लिहिलाय. तिनं ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन क्रीडा प्रकारात भारताला सिल्व्हर मेडलची कमाई करुन दिली आहे. ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल पटकावणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.
रियो ऑलिम्पिकमध्ये भारताला नवी फुलराणी गवसली आहे. या फुलराणीनं आपल्या खेळानं सा-या देशाला प्रभावित तर केलंच याखेरीज ऐतिहासिक कामगिरीही केली. सोशल मीडियावरही सिंधूची धूम कायम आहे. शुक्रवारी पी. व्ही. सिंधू ही ट्विटरवर ट्रेंड करत होती.
२ दिवसात फेसबूक आणि ट्विटवर सिंधूचे फॉलोअर्स वाढले आहे. फेसबूकवर २ दिवसात पी. व्ही सिंधूच्या पेजला लाखो लोकांनी लाईक्स केलं आहे. तर ट्विटरवरही तिचे फॉलोअर्स मोठ्या प्रमाणात वाढले आहे. २ दिवसांपूर्वी अनेकांना माहित नसलेली पी. व्ही सिंधूने ऐतिहासिक कामगिरी करत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.