आयपीएल-१० चा धडाका आजपासून होणार सुरू...

इंडियन प्रीमिअर लीगच्या दहाव्या सीझनला आजपासून सुरूवात होणार आहे. आयपीएलचा ओपनिंग सेरेमनी आज हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये होणार आहे. मॅच सुरू होण्यापूर्वी दहाव्या सीझनचा रंगारंग सोहळा पार पडेल. यात बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील स्टार्सचा जलवाही पाहायला मिळेल. 

Updated: Apr 5, 2017, 11:48 AM IST
आयपीएल-१० चा धडाका आजपासून होणार सुरू...  title=

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या दहाव्या सीझनला आजपासून सुरूवात होणार आहे. आयपीएलचा ओपनिंग सेरेमनी आज हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये होणार आहे. मॅच सुरू होण्यापूर्वी दहाव्या सीझनचा रंगारंग सोहळा पार पडेल. यात बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील स्टार्सचा जलवाही पाहायला मिळेल. 

ओपनिंग सेरेमनी सायंकाळी ६ ते ६.३० पर्यंत सुरू राहील. आज होणाऱ्या या सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री अॅमी जॅक्सन परफॉर्म करताना दिसणार आहे. 

यंदा आयोजनकर्त्यांनी प्रत्येक टीमसाठी एक अशा एकूण आठ ओपनिंग सेरेमनी आयोजित केल्या आहेत. वेगवेगळ्या जागांवर अॅमी जक्सन, श्रद्धा कपूर, परिणीती चोप्रा, टायगर श्रॉफ, रितेश देशमुख आणि बॉलिवूडचे इतर कलाकार परफॉर्म करणार आहेत.

पहिली मॅच सनरायजर्स हैदराबाद Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

उद्घाटन समारंभानंतर आयपीएल सीझन १० ची पहिली मॅच हैदराबादमध्येच सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या टीम्स दरम्यान खेळली जाईल.

मंगळवारी विराट कोहलीनं ट्विटरवर आयपीएल टीम्सच्या सर्व कॅप्टन्ससोबत एक सेल्फीदेखील पोस्ट केलीय. यंदा आयपीएल-१० मध्ये ४७ दिवसांत एकूण ६० मॅचेस खेळल्या जाणार आहेत. यामध्ये आठ टीम्सचा सहभाग आहे. या सीझनची फायनल मॅच हैदराबादमध्ये २१ मे रोजी खेळली जाईल.