क्रिकेटमध्येही दिसणार रेड कार्ड

खेळादरम्यान होणारी गैरवर्तणूक रोखण्यासाठी आता फुटबॉल आणि हॉकीप्रमाणेच क्रिकेटमध्ये रेड आणि येलो कार्डचा वापर करण्याबाबतचा विचार सुरु आहे. 

Updated: Feb 11, 2016, 10:42 AM IST
क्रिकेटमध्येही दिसणार रेड कार्ड title=

लंडन : खेळादरम्यान होणारी गैरवर्तणूक रोखण्यासाठी आता फुटबॉल आणि हॉकीप्रमाणेच क्रिकेटमध्ये रेड आणि येलो कार्डचा वापर करण्याबाबतचा विचार सुरु आहे. 

मेलबर्न क्रिकेट क्लबने प्रायोगिक तत्वावर  हा नियम राबवण्याचा निर्णय घेतला. या नियमांतर्गत एखाद्या क्रिकेटपटूने गैरवर्तणूक केल्यास त्याला रेडकार्ड दाखवून मैदानाबाहेर जाण्याची सूचना देण्यात येईल अथवा १० षटकांसाठी पेनल्टी बॉक्समध्ये पाठवण्यात येईल. 

एमसीसी सध्या क्लब, महाविद्यालयीन आणि शालेयस्तरावर हा नियम सुरु करणार आहे. क्रिकेटमध्ये गैरवर्तणूक केल्यास संबंधित खेळाडूवर आयसीसीच्या नियमानुसार कारवाई केली जाते. अनेकदा ही कारवाई दंडात्मक स्वरुपाची असते तर अनेकदा त्या क्रिकेटपटूंना काही सामने खेळण्यास बंदी घातली जाते. एमसीसीने याबाबत आचारसंहिता बनवली आहे. 

या प्रस्तावात चौथ्या श्रेणीत अंपायरल धमकी देणे, एखाद्या खेळाडू अथवा अधिकाऱ्यावर हल्ला करणे, वादग्रस्त विधान करणे या गुन्ह्यांच्या समावेश आहे. तिसऱ्या श्रेणींतगर्त एखादा क्रिकेटपटू दोषी आढळल्यास त्याला १० षटकांसाठी पेनल्टी बॉक्समध्ये पाठवण्यात येईल.