'जोकोविच' झाला पुन्हा वर्ल्ड नंबर वन

एटीपीच्या काल रात्री झालेल्या शेवटच्या सामन्यात नोवाक जोकोविच सलग चौथ्यादा विजयी झाला आहे.

Updated: Nov 23, 2015, 07:04 PM IST
 'जोकोविच' झाला पुन्हा वर्ल्ड नंबर वन title=

लंडन : एटीपीच्या काल रात्री झालेल्या शेवटच्या सामन्यात नोवाक जोकोविच सलग चौथ्यादा विजयी झाला आहे.

रॉजर फेडर सोबत झालेल्या या अति-तटीच्या सामन्यामध्ये ६-३ , ६-४ असा विजय मिळवला. एटीपी वर्ल्ड टूर टेनिसच्या इतिहासात गेल्या ४६ वर्षाच्या कालावधीमध्ये कोणीही सलग चार वेळा हा किताब जिंकलेला असा खेळांडू नव्हता.

हा सामना जिंकून सर्बियाच्या नोवाक जोकोविचने नवा इतिहास रचला आहे. 

जोकोविच्या कारर्कीदीमधील १५ वी टूर मॅच होती. २०१५ मध्ये खेळलेल्या ८८ सामान्यात ८२ जिंकले आहे. विम्बंलडन,ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका ओपन किताब जिंकला आहे. त्यांने यावर्षी त्यांची सगळ्यात उत्तम कामगिरी केली आहे. हा सामना जिंकल्यानंतर एटीपी क्रमवारी मध्ये २८ वयाचा जोकोविच १६,५८५ अंकानी प्रथम क्रमांका वर पोहचला आहे. दुसऱ्या स्थानावर इग्लंडंचा अॅण्डी मरे तर एटीपी सामना हारल्यानंतर रॉजर फेडर हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.