नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा 'कॅप्टन कूल' नाही, तर त्याला योगाची अत्यंत गरज आहे, असे टीम इंडियाचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी म्हटलंय.
बेदी यांनी कॅप्टन महेंद्र सिंह धोनीचा चांगलाच समाचार घेतांना म्हटलंय, बांगलादेश विरुद्धची मालिका गमावल्यानंतर धोनी बेताल वक्तव्ये करू लागला आहे. धोनीने पहिल्यांदाच त्याने अशा प्रकारची वक्तव्ये केले आहे. यावरून धोनी 'कॅप्टन कूल' नसल्याचे स्पष्ट झाले आहे, म्हणून त्याला योगाची अत्यंत गरज आहे.
दरम्यान, मला वनडे कर्णधारपदावरून हटविण्याची इच्छा असल्यास, मला कर्णधारपद सोडण्यात कोणतीच अडचण नाही, असे धोनीने म्हटले होते, याचाच बिशनसिंह बेदी यांनी समाचार घेतलाय.
भारतीय संघाला बांगलादेशविरुद्ध पहिल्या दोन्ही एकदिवसीय सामन्यात लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला आहे. तिन सामन्यांच्या मालिकेत भारताचा संघ २-० ने पिछाडीवर आहे. भारतीय संघाच्या या पराभवामुळे संघावर जोरदार टीका करण्यात येत आहे.
बेदी भारताच्या पराभवावर म्हणाले, 'बांगलादेशच्या खेळाडूंनी चांगला खेळ खेळला, यामध्ये कोणतीच शंका नाही. परंतु, भारतीय क्रिकेट संघाने दौऱ्यापूर्वी कोणती योजना आखली होती? त्यांनी हा दौरा सहजपणे घेतला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसारखे खेळलेच नाहीत, असे त्यांच्या देहबोलीवरून दिसत होते'.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.