ऑकलँड : न्यूझीलंडने ट्रेंट बोल्ट आणि मॅट हेनरीने केलेल्या आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला १५९ धावांनी धूळ चारली.
न्यूझीलंडने आठ बाद ३०७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल ऑस्ट्रेलियाची संपूर्ण टीम २५व्या षटकांत १४८ धावांत गारद झाली. बोल्ट आणि हेनरीने प्रत्येकी तीन विकेट ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलडचा मार्टिन गप्टिलने ९०, हेनरी निकोल्स ६१ आणि ब्रँडन मॅकक्युलमने ४४ धावांची खेळी केली होती. यामुळे ३० षटकांतच संघाने २०० धावांचा टप्पा पार ओलांडला होता. त्यानंतर पुढील २० षटकांत न्यूझीलंडला ३०७ धावांपर्यंत मजल मारता आली.
विजयाच्या या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. त्यांनी नऊ षटकांत ४१ धावांत तब्बल सहा गडी गमावले. मॅथ्यू वेड आणि जेम्स फॉकनर यांनी ७९ धावांची भागीदारी करताना ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र हे प्रयत्न अपुरे ठरले. त्यानंतर दोघेही बाद झाले. यासोबतच न्यूझीलंडने १५९ धावांनी विजय मिळवला.