मुंबई: टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात झाली आहे. 15 मार्चला भारतीय संघ न्यूझिलंडविरुद्ध आपली पहिली मॅच खेळणार आहे. भारतामध्येच हा टी-20 वर्ल्ड कप होत असल्यानं कोट्यवधी फॅन्सना भारत 2007च्या टी-20 वर्ल्ड कप सारखीच कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.
या टी-20 वर्ल्ड कपआधी रॉयल चॅलेंज स्पोर्ट्स ड्रिंकनं नवीन एँथम साँग तयार केलं आहे. प्ले बोल्ड हे गाणं बुधवारी लॉन्च करण्यात आलं, आणि त्यानंतर इंटरनेटवर हे गाणं मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
आत्तापर्यंत 3 लाख जणांनी हे गाण पाहिलं आहे. भारताचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनंही हे गाण आपल्या फेसबूक पेजवर शेअर केलं आहे.