ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅच आधी नवा 'मौका'

 टी 20 वर्ल्ड कपमध्ये आता भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या मॅचमध्ये जी टीम जिंकेल त्याला सेमी फायनलचं तिकीट मिळणार आहे. 

Updated: Mar 26, 2016, 03:11 PM IST
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅच आधी नवा 'मौका' title=

मुंबई: टी 20 वर्ल्ड कपमध्ये आता भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या मॅचमध्ये जी टीम जिंकेल त्याला सेमी फायनलचं तिकीट मिळणार आहे. 

या मॅचआधी सोशल मिडियावर वातावरण चांगलंच तापलं आहे. युजर्स आपली अफलातून क्रिएटिव्हिटी फोटो आणि वेगवेगळ्या व्हिडियोच्या माध्यमातून सोशल नेटवर्किंगवर शेअर करत आहेत. 

2015 च्या वर्ल्ड कपवेळी मौका-मौका हे गाणं चांगलंच फेमस झालं, यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्येही या गाण्यानं क्रिकेट रसिकांना भुरळ घातली. 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचआधीही मौका मौकाचा नवा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.