नरसिंग यादवला 'नाडा'कडून मोठा दिलासा

 नॅशनल डोपिंग एजन्सी  म्हणजेच 'नाडा'ने अखेर नरसिंग यादवला डोपिंग प्रकरणी क्लिन चीट दिली आहे. 'नाडा'ने या प्रकरणी गुरूवारीच संपूर्ण सुनावणी पूर्ण केली होती. 

Updated: Aug 1, 2016, 05:53 PM IST
नरसिंग यादवला 'नाडा'कडून मोठा दिलासा title=

नवी दिल्ली : भारतीय पहेलवान नरसिंग यादव अखेर रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे. नॅशनल डोपिंग एजन्सी  म्हणजेच 'नाडा'ने अखेर नरसिंग यादवला डोपिंग प्रकरणी क्लिन चीट दिली आहे. 'नाडा'ने या प्रकरणी गुरूवारीच संपूर्ण सुनावणी पूर्ण केली होती. 

नरसिंग यादव डोपिंगच्या दोन टेस्टमध्ये नापास झाला होता, यानंतर नरसिंगच्या रिओ ऑलिम्पिकला जाण्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं.मीडियावर येत असलेल्या बातम्यांनुसार नाडाच्या अधिकाऱ्यांनी हे म्हटलं आहे की, नरसिंह हा कटकारस्थानाचा शिकार झाला होता.

मात्र नाडाच्या वकिलांनी गुरूवारी सांगितलं होतं की, उत्तेजक द्रव्य नरसिंग यादवच्या शरीरात कसं आलं ते अजून समजू शकलेलं नाही. भारतीय ऑलिम्पिक संघ याबाबतीत नरसिंग यादवच्या मागे उभा ठाकला आहे, याबाबतीत पूर्ण मदत करण्याचा विश्वास नरसिंगला देण्यात आला आहे.

नरसिंह यादवने हे आपल्याविरोधात कटकारस्थान असल्याचं सांगितलं होतं. नरसिंग यादवच्या खाण्यात कुणीतरी उत्तेजक द्रव्य मिसळली होती, अशा बातम्या मीडियात यापूर्वी आल्या होत्या, पण या आरोपात अजून कुणालाही अटक झालेली नाही.