प्रविण कुमार चॅम्पियन्स लीगमधून बाहेर

Updated: Sep 16, 2014, 05:20 PM IST
प्रविण कुमार चॅम्पियन्स लीगमधून बाहेर title=

रायपूर : लाहोर लायन्स आणि मुंबई इंडियन्समध्ये झालेल्या पहिल्या मॅचच्या वेळी उजव्या खांद्याला गंभीर दुखापतीमुळे प्रविण कुमारला चॅम्पियन्स लीग टी-२० मधून बाहेर करण्यात आले आहे.
मुंबई इंडियन्स आणि लाहोर लायन्स यांच्यात शनिवारी क्वॉलिफायर मॅचवेळी तो जखमी झाला होता. त्यामुळे त्याला डॉक्टरच्या देखरेखीमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्या रिपोर्टची वाट टीम बघत होती. आता त्याला झालेली दुखापत गंभीर असल्याने दिल्लीचा डावखुरा गोलंदाज पवन सुयाल हा प्रविण कुमारच्या जागी संपूर्ण चॅम्पियन्स लीग टूर्नामेंटमध्ये खेळणार आहे.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.