कोलकाता : भारत आणि न्यूझीलंड यांच्या एक दिवसीय मालिका सुरु आहे. चौथा सामना भारताने गमावलाने मालिकेत बरोबर झाली. कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या रांचीच्या होमपिचवरच हा पराभव झाल्याने टीका होत आहे. धोनीला माजी कर्णधार सौरभ गांगूली अर्था बंगालचा दादाने मोठा सल्ला दिलाय.
कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एकदिवसीय सामन्यांमध्ये चौथ्या क्रमांकावरच खेळायला यावे, असे सौरव गांगुलीने म्हटले आहे. कारण या क्रमांकावर फलंदाजीला आल्यावरही धोनी विजयावर सहज साकारु शकेल. धोनी हा विजय साकारणा फलंदाज आहे. त्यामुळे त्याने ४०व्या षटकामध्येच फलंदाजीला यावे, असे काही नाही.
धोनीबरोबर विराट कोहलीलाही त्याने सल्ला दिलाय. तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला आल्यावर तो देखील विजयवीराची भूमिका वठवू शकतो. विजयवीराने अखेरच्या षटकांमध्ये यावे, ही संकल्पना चुकीची आहे, असे गांगुलीने म्हटले आहे. रांची येथे बुधवारी चौथा एकदिवसीय सामना झाला. या सामन्यात न्यूझीलंडने भारताला १९ धावांनी पराभूत केले होते.