महेंद्रसिंग धोनीचा कर्णधार म्हणून नवा विक्रम

 भारताचा मर्यादित षटकांचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या नावावर एक अनोखा विक्रम केला आहे. धोनी हा पहिला आणि एकमेव कर्णधार आहे की त्याने पाच महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्या आहेत. 

Bollywood Life | Updated: Mar 7, 2016, 10:45 PM IST
 महेंद्रसिंग धोनीचा कर्णधार म्हणून नवा विक्रम  title=

ढाका :  भारताचा मर्यादित षटकांचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या नावावर एक अनोखा विक्रम केला आहे. धोनी हा पहिला आणि एकमेव कर्णधार आहे की त्याने पाच महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्या आहेत. 

धोनीने ही कामगिरी यंदा आशिया कप जिंकल्यानंतर केली आहे. 

यापूर्वी धोनीने आयसीसी टी-२० वर्ल्ड कप, आयसीसी वर्ल्ड कप, आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी, आशिया कप आणि आशिया कप टी-२० या स्पर्धांचा समावेश आहे. 

आता उद्यापासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड टी-२० स्पर्धा जिंकून धोनी या विक्रमाला अजून बळकटी देण्याचा विचार करत आहे.