बंगळुरू : भारत आणि दक्षिण आफ्रिके दरम्यान सुरु असलेल्या 'फ्रीडम सीरीज'ची बंगळुरूमध्ये पार पडलेली दुसरी टेस्ट पावसानं धुवून काढली. पण, भारताला गवसलेला सूर मात्र पुढच्या मॅचमध्ये कायम राहील असा विश्वास कर्णधार विराट कोहलीनं व्यक्त केलाय.
बंगळुरुमध्ये जे झालं त्यावर नियंत्रण ठेवणं आमच्या हातात नव्हतं. जे आमच्या हातात होतं ते आम्ही मॅचच्या पहिल्या दिवशी करून दाखवलं... आणि तेही चांगल्या पद्धतीनं... पुढच्या मॅचमध्येही याच पद्धतीनं खेळण्याचा आम्ही प्रयत्न करू, असंही विराटनं म्हटलंय.
अधिक वाचा - भारत टी-२० वर्ल्डकप जिंकू शकतो
बंगळुरूमध्ये केवळ एकच दिवशी खेळणं शक्य झालं. भारतीय बॉलर्सची कमाल या दिवशी दिसून आली होती. 'वर्ल्ड नंबर वन'वर असलेल्या टीमला केवळ 59 ओव्हर्समध्ये 214 रन्ससहीत गाशा गुंडाळायला लावणाऱ्या भारतीय टीमचा निश्चितच आत्मविश्वास वाढलेला आहे. याच विश्वासासहीत ही टीम नागपूरमध्ये मैदानावर उतरणार आहे.
अधिक वाचा - भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याचे वेळापत्रक
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदानावर 25 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान ही मॅच रंगणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.