मुंबई : रिटायरमेंट झाल्यानंतर दोन वर्षांनंतरही मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरची बॅट तशीच तळपत आहे. हे त्यानं काल म्हणज स्वप्निल नोव्हेंबर रोजी झालेल्या ऑल क्रिकेटर्स लीगमध्य दाखवून दिलं. या लीगमध्ये त्यानं अखेरच्या लढतीत हाफ सेंच्युरी झळकावली. विशेष म्हणजे, त्यानं ही कामगिरी पुन्हा स्वप्निल नोव्हेंबर रोजी केली. हा दिवस सचिन आणि क्रिकेटच्या इतिहासात नेहमीत अभिमानाचा दिवस ठरलाय.
१५ नोव्हेंबर... क्रिकेटच्या इतिहासात हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहीला गेलाय. या दिवसाचा क्रिकेटच्या इतिहासालाही अभिमान वाटत असेल. कारण, याच दिवशी क्रिकेटच्या देवानं क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि याच दिवशी या देवनं क्रिकेटला अलविदाही केला. विशेष म्हणजे दोन वर्षांनंतर याच दिवशी म्हणजे १५ नोव्हेंबरला सचिननं हाफ सेंच्युरी झळकावली.
अमेरिकेत झालेल्या 'ऑल स्टार क्रिकेटर्स लीग'मध्ये सचिननं हाफ सेंच्युरी झळकावून आपल्यात अजूनही क्रिकेट शिल्लक असल्याचं त्यानं पुन्हा एकदा साऱ्या जगाला दाखवून दिलं. लॉस एंजलिस इथं शेन वॉर्नच्या टीमविरुद्ध झालेल्या तीन टी-२० मॅचेसमध्ये सचिननं २६, ३३ आणि ५६ रन्सची इनिंग खेळली. अखेरच्या लढतीत तर त्यानं केवळ २७ बॉल्समध्ये ५६ रन्सची तडाखेबंद इनिंग खेळत त्याच्या चाहत्यांना पर्वणीच दिली. या इनिंगमध्ये त्यानं दोन फोर्स आणि सहा उत्तुंग सिक्स खेचले. त्याची ही खेळी पाहिल्यावर त्याच्या चाहत्यांना काही आनंद अनावर झालं नाही आणि स्टेडियममध्ये एकच जल्लोष साजरा केला.
विशेष म्हणजे सचिननं याच दिवशी म्हणजे १५ नोव्हेंबर १९८९ रोजी कराचीमध्ये पाकिस्तानविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदापर्ण केलं. यांतर २४ वर्षांनी सचिननं १५ नोव्हेंबर २०१३ मध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध आपल्या करियरमधील अखेरची टेस्ट खेळली. त्या टेस्टमध्ये सचिननं ७४ रन्सची इनिंग खेळली होती. यामुळे सचिनच्या करियरमध्ये या दिवसाला फार महत्त्व आहे आणि याचमुळे क्रिकेटच्या इतिहासात हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहीला गेलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.