मायकल फेल्प्सनं जिंकलं 19वं ऑलिम्पिक गोल्ड

अमेरिकेचा स्विमर मायकल फेल्प्सनं त्याचा कारकिर्दितलं 19वं ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकून इतिहास रचला आहे.

Updated: Aug 8, 2016, 06:19 PM IST
मायकल फेल्प्सनं जिंकलं 19वं ऑलिम्पिक गोल्ड  title=

रिओ : अमेरिकेचा स्विमर मायकल फेल्प्सनं त्याचा कारकिर्दितलं 19वं ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकून इतिहास रचला आहे. अमेरिकेनं 4X100मीटर फ्रीस्टाईल रिले रेसमध्ये गोल्ड मेडल जिंकलं. फेल्प्स या टीमचा सदस्य होता. अमेरिकेच्या टीमनं तीन मिनीट आणि 9.92 सेकंदांमध्ये ही रेस पूर्ण केली.

31 वर्षांच्या फेल्प्सला आत्तापर्यंत पाच ऑलिम्पिकमधून एकूण 23 मेडल्स मिळाली आहेत.  या क्षणावेळी मी भावूक झालो आणि माझ्या डोळ्यातून अश्रू आले, असं फेल्प्स म्हणाला आहे. 2012 च्या लंडन ऑलिम्पिकनंतर फेल्प्सनं निवृत्त व्हायची घोषणा केली होती. यानंतर 2014मध्ये त्यानं पुन्हा एकदा पुनरागमन केलं. 

मायकल फेल्प्स ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये सर्वाधिक गोल्ड मेडल जिंकणारा ऍथलिट आहे. फेल्प्सनंतर रशियाची जिमनास्ट लुरीसा लातनीनाचा नंबर लागतो. लुरीसानं ऑलिम्पिकमध्ये एकूण 9 गोल्ड मेडल पटकावली आहेत.