भारताचा कोच व्हायची ऑफर हसीनं नाकारली

 भारतीय क्रिकेट संघाचा कोच व्हायची ऑफर आपण नाकारली, असा खुलासा ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकल हसीनं केला आहे.

Updated: Mar 3, 2016, 05:30 PM IST
भारताचा कोच व्हायची ऑफर हसीनं नाकारली title=

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कोच व्हायची ऑफर आपण नाकारली, असा खुलासा ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकल हसीनं केला आहे. व्ही.व्ही.एस. लक्ष्मणनं आपल्याला ही ऑफर दिल्याचं हसीनं म्हंटलं आहे. मायकल हसीनं आपल्या पुस्तकामध्ये हा दावा केला आहे. 

2015 च्या वर्ल्ड कपनंतर डंकन फ्लेचर यांच्या जागी भारत कोचच्या शोधामध्ये होता. त्याच दरम्यान आयपीएलवेळी लक्ष्मणनं मला कोचिंगबाबत विचारणा केल्याचं हसीनं 'विनिंग एज' या आपल्या पुस्तकात म्हंटलं आहे. 

श्रीलंकेचा क्रिकेटपटू महिला जयवर्धनेनंही श्रीलंकेचा कोच होशील का म्हणून विचारलं होतं. पण मला माझ्या कुटुंबाला वेळ द्यायचा होता, म्हणून मी या दोघांनाही नकार कळवल्याचं हसी म्हणाला आहे.