टेनिस एल्बोमुळे धोनीने घेतली टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती

 टीम इंडियाचा वन डे कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सहा महिने झाले पण त्याचे फॅन्स त्याच्या या निर्णयाला अजून पचवू शकले नाहीत. धोनीच्या रिटायरमेंट संदर्भात एक मोठा खुलासा झाला आहे की त्याला टेनिस एल्बोचा त्रास होत असल्याने त्याला टेस्ट क्रिकेटमधून लवकर निवृत्ती घेतली. 

Updated: Jun 18, 2015, 09:04 PM IST
टेनिस एल्बोमुळे धोनीने घेतली टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती  title=

नवी दिल्ली :  टीम इंडियाचा वन डे कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सहा महिने झाले पण त्याचे फॅन्स त्याच्या या निर्णयाला अजून पचवू शकले नाहीत. धोनीच्या रिटायरमेंट संदर्भात एक मोठा खुलासा झाला आहे की त्याला टेनिस एल्बोचा त्रास होत असल्याने त्याला टेस्ट क्रिकेटमधून लवकर निवृत्ती घेतली. 

धोनीचे माजी कोच एमपी सिंह यांनी झी न्यूजशी बोलताना सांगितले की, धोनीने टेस्ट क्रिकेट खेळताना टेनिस एल्बो झाल्याचे सांगितले होते. धोनीला टेस्ट मॅट खेळताना टेनिस एल्बो हा आजार बळावण्याची भीती होती. या दुखण्यामुळे धोनीने टेस्टमध्ये अनेक शॉट्स खेळणे बंद केले होते. त्यानंतर धोनीने अचानक टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. पण निवृत्ती का घेतो आहे याचे कारण त्याने सांगितले नव्हते. पण धोनीच्या माजी कोचनुसार त्याच्या निवृत्तीचे हेच कारण आहे. 

विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकर यालाही या दुखण्याला सामोरे जावे लागले होते. पण काही काळानंतर सचिन या आजारातून बरा होऊन टेस्टमध्ये पुनरागमन झाले होते. आपल्या क्रिकेट करिअरमध्ये अनेक इंज्युरिंचा सामना करणाऱ्या तेंडुलकरने तीन वर्षांपूर्वी सांगितले की, एकदा असे वाटले होते की पुन्हा कधी बॅट पकडू शकणार नाही. ही स्थिती खूप वाईट होती. टेनिस एल्बोनंतर मुलगा अर्जुनची प्लास्टिकची बॅटही उचलणे सचिनला कठीण झाले होते. 

पहिल्यांदा मैदानात उतरल्यावर १०-१२ वर्षांची मुले मी टोलावले फटके आडवत होते. मला वाटले की मी कधी खेळू शकणार नाही. तो दबाव काही वेगळाच होता. त्यावेळी अनेकांच्या मदतीने मी पुनरागमन करू शकलो, असे तेंडुलकरने सांगितले होते. 

धोनीने २०१४ मध्ये ऑस्ट्रेलिया टेस्ट सिरीजच्या मध्यावर अचानक टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. धोनीने एकूण ९० टेस्ट सामने खेळल्यानंतर हा निर्णय घेतला आणि त्यामुळे अनेकांना धक्का बसला होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.