हॉटेलमधून धोनीचे ३ मोबाईल चोरीला

द्वारका भागात ५ स्टार हॉटेल वेलकममध्ये शुक्रवारी आग लागली होती. या हॉटेलमध्ये भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीसह झारखंड संघाचे खेळाडू थांबले होते. धोनी दिल्लीमध्ये विजय हजारे ट्रॉफीचा सामना खेळण्यासाठी आला होता. संपूर्ण टीमला आग लागल्यानंतर तेथून सुखरुप बाहेर काढण्यात आलं होतं. पण आग लागण्याच्या दरम्यान धोनीचे ३ मोबाईल चोरीला गेले.

Updated: Mar 19, 2017, 10:38 AM IST
हॉटेलमधून धोनीचे ३ मोबाईल चोरीला title=

नवी दिल्ली : द्वारका भागात ५ स्टार हॉटेल वेलकममध्ये शुक्रवारी आग लागली होती. या हॉटेलमध्ये भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीसह झारखंड संघाचे खेळाडू थांबले होते. धोनी दिल्लीमध्ये विजय हजारे ट्रॉफीचा सामना खेळण्यासाठी आला होता. संपूर्ण टीमला आग लागल्यानंतर तेथून सुखरुप बाहेर काढण्यात आलं होतं. पण आग लागण्याच्या दरम्यान धोनीचे ३ मोबाईल चोरीला गेले.

धोनी हॉटेलच्या ७ व्या माळ्यावर होता. सकाळी जवळपास ५.३० च्या दरम्यान आग लागली होती. एका खेळाडूने सांगितलं की, सगळे जण नाश्ता करत होते तेव्हा अचानक जळण्याचा वास येऊ लागला. या घटनेनंतर विजय ट्रॉफीचा सेमीफायनल सामना पुढे ढकलण्यात आला होता. घटनेदरम्यान हॉटेलमध्ये जवळपास ५४० गेस्ट होते.