महात्मा गांधी- मंडेलाची नवी ओळख 'फ्रिडम ट्रॉफी'

महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला दोघांनीही अहिंसक मार्गानं स्वांतत्र्यासाठी लढा दिला. शांततेचं प्रतिक असलेल्या या दोन महान व्यक्तिमत्त्वांमुळे दोन्ही देशही जोडले गेले. सध्या तर दोन्ही देशांतील क्रिकेट बोर्ड या दोन व्यक्तिमत्वांद्वारे दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ करत आहेत. 

Updated: Nov 5, 2015, 12:08 PM IST
महात्मा गांधी- मंडेलाची नवी ओळख 'फ्रिडम ट्रॉफी'   title=

मुंबई : महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला दोघांनीही अहिंसक मार्गानं स्वांतत्र्यासाठी लढा दिला. शांततेचं प्रतिक असलेल्या या दोन महान व्यक्तिमत्त्वांमुळे दोन्ही देशही जोडले गेले. सध्या तर दोन्ही देशांतील क्रिकेट बोर्ड या दोन व्यक्तिमत्वांद्वारे दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ करत आहेत. 

हे ऐकून जरा तुम्ही गोंधळात पडले असाल. भारतीय क्रिकेट बोर्डानं येरवडा तुरुंगाचे आणि दक्षिण आफ्रिकेतील रॉबिन आयलँड तुरुंगाच्या सळ्या का बरं मागवल्या असव्यात ? तर ऐका...सध्या भारतात टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान जी सीरिज सुरु आहे तिला फ्रिडम ट्रॉफी असं नाव देण्यात आलय. 

हे नावदेखील महात्मा गांधी आणि दक्षिण आफ्रिकेचे महान स्वातंत्र्य सैनिक नेल्सन मंडेला यांच्या स्वातंत्र्य लढ्यावरून देण्यात आलय. दोघांनीही आपआपल्या देशाला स्वांतत्र्य मिळवण्यासाठी खूप मोठा लढा दिला आणि अनेक काळ तुरुंगाच्या गजाआड व्यतीत केला. यामुळे या दोन महान स्वातंत्र्यसैनिकांनी जिथं तुरुंगवास भोगला त्या कोठडीच्या सळ्यांचा वापर करुन बीसीसीआयला फ्रीडम ट्रॉफी बनवायची आहे. 

याचसाठी बीसीसीआयनं येरवडा प्रशासनाला पत्र पाठवून गांधीजींना स्वातंत्र्य लढ्यात ज्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं त्या कोठडीच्या दोन सळ्या मागवल्या आहेत. याचबरोबर मंडेलांना जिथं तुरुंगवासाठी शिक्षा ठोठवण्यात आली होती त्या रॉबिन आयलंडच्याही दोन सळ्या बीसीसीआयनं मागवल्यात. 

बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांनी हे पत्र ७ ऑक्टोबरला तुरुंग प्रशासनाला पाठवलं असून मुख्यमंत्र्यांनाही या पत्राची प्रत त्यांनी पाठवलीय. याचबरोबर दक्षिण आफ्रिकन क्रिकेटलाही त्यांनी याबाबत पत्र लिहिलय. यामुळेच या फ्रीडम ट्रॉफीचं महत्त्व अधिक वाढल असून दोन्ही देशांतील नागरीकांसाठी ही ट्रॉफी विशेष असणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.