वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये लोकेश राहुलची सेंच्युरी

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये लोकेश राहुलनं शानदार सेंच्युरी झळकावली आहे.

Updated: Jul 31, 2016, 10:16 PM IST
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये लोकेश राहुलची सेंच्युरी title=

किंग्सटन : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये लोकेश राहुलनं शानदार सेंच्युरी झळकावली आहे. टेस्ट क्रिकेटमधली लोकेश राहुलची ही तिसरी सेंच्युरी आहे. याआधी लोकेश राहुलनं ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्ध सेंच्युरी मारली होती. मुख्य म्हणजे राहुलनं या तिन्ही सेंच्युरी भारताबाहेर बनवल्या आहेत. 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी टेस्टमध्ये राहुलनं 110 रनची खेळी केली होती, तर श्रीलंकेविरुद्ध कोलंबोमध्ये त्यानं 108 रन बनवल्या होत्या. राहुलच्या या सेंच्युरीमुळे दुसऱ्या टेस्टमध्येही भारत मजबूत स्थितीत पोहोचला आहे.