सहा महिन्यात एमसीए अध्यक्षपदाचा राजीनामा देणार - शरद पवार

येत्या सहा महिन्यात एमसीएच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचं शरद पवार यांनी आज जाहीर केलंय. वेळ आल्यावर निश्चित तारीख जाहीर केली जाईल असं शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केलं.

Updated: Jul 24, 2016, 04:35 PM IST
सहा महिन्यात एमसीए अध्यक्षपदाचा राजीनामा देणार -  शरद पवार  title=

मुंबई : येत्या सहा महिन्यात एमसीएच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचं शरद पवार यांनी आज जाहीर केलंय. वेळ आल्यावर निश्चित तारीख जाहीर केली जाईल असं शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केलं.

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, मी सहा महिने या पदावर राहू शकतो. मात्र माझे काम संपल्यावर मी निवृत्त होईन असे पवार यावेळी म्हणाले. 

न्यायालयाने लोढा समितीच्या शिफारसी मान्य करत बीसीसीआयमध्ये पदाधिका-यांची वयोमर्यादा 70 वर्षांची केली आह. तसंच मंत्र्यांसाठीही दरवाजे बंद झालेत.

येत्या सहा महिन्यांच्या आत या शिफारसींवर अंमलबजावणी करावी लागणार आहे. त्यामुळे या सहा महिन्यातच आपण पद सोडू असं शरद पवार यांनी जाहीर केलंय.