ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा केला पराभव

ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा केला पराभव

Updated: Mar 25, 2016, 06:33 PM IST

मुंबई : जेम्स फॉकनर यांच्या धारदार गोलंदाजीमुळे आणि कर्णधार स्वीव्ह स्मिथ यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा २१ धावांनी पराभव केला.

ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान समोर आजच्या सामन्यात १९४ धावांचे कठीण आव्हान दिले होते. पाकिस्तान या धावांचा पाठलाग करतांना ८ बाद १७२ धावांपर्यंत मजल मारता आली.  पाकिस्तानकडून सर्वाधिक खालिद लतिफ याने ४६ धावा केल्या तर जेम्स फॉकनर याने शानदार कामगिरी करत ५ विकेट घेतल्या.

सुरूवातीला ऑस्ट्रेलियाने १९३ धावा करताना कर्णधार स्मिथ याने ६१ धावा केल्या. तर त्याला निवृत्तीचे वेध लागलेल्या शेन वॉटसनने ४४ धावांची अनमोल साथ दिली. पाकिस्तानकडून वहाब रियाद आणि इमाद वासिम यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. 

Live स्कोअरकार्ड टी-२० वर्ल्डकप : ऑस्ट्रेलिया vs पाकिस्तान

पाहा लाईव्ह स्कोर