'श्रीशांत, चव्हाण, चंडीलावरची बंदी हटणार नाही'

एस.श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांच्यावर घातलेल्या आजन्म क्रिकेटबंदीचा पुन्हा विचार करणार नसल्याचं बीसीसीआयनं स्पष्ट केलंय.

Updated: Jul 31, 2015, 01:02 PM IST
'श्रीशांत, चव्हाण, चंडीलावरची बंदी हटणार नाही' title=

नवी दिल्ली : एस.श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांच्यावर घातलेल्या आजन्म क्रिकेटबंदीचा पुन्हा विचार करणार नसल्याचं बीसीसीआयनं स्पष्ट केलंय.

न्यायालयानं जरी आयपीएल २०१३ स्पॉट फिक्सिंग प्रकरणात या तिघांना दोषमुक्त केलं असलं तरी या तिघांवर घातलेली आजीवन बंदी हटवण्यासंबंधी बीसीसीआय पुनर्विचार करणार नाही, असं बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी म्हटलंय.

पटियाला हाऊस कोर्टानं आयपीएलच्या सहाव्या मोसमातील स्पॉट फिक्सिंगप्रकरणी श्रीशांत, चव्हाण, अजित चंडिला यांच्यासह ३६ जणांना निर्दोष सोडलंय. मात्र, दोन्ही खेळाडूंवरील आजन्म बंदीचा पुनर्विचार करणार नसल्याचं बीसीसीआय़ सचिव अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केलंय. 

केरळ क्रिकेट संघानं बीसीसीआयकडे श्रीशांतला पुन्हा एकदा खेळण्याची संधी मिळावी, अशी मागणी केली होती. त्यावर, शिस्तभंगाची कारवाई आणि गुन्हेगारी कारवाई वेगवेगळी असल्याचं सांगत बीसीसीआयनं पुनर्विचार करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिलाय. त्यामुळे, या तिन्ही खेळाडुंवर ही बंदी लागू राहणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.