नवी दिल्ली : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या नात्याचा सन्मान करा, असं क्रिकेटपटू युवराज सिंहने म्हटलं आहे.
वर्ल्डकप स्पर्धेतील सेमी फायनलमध्येऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव झाल्यानंतर, भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली आणि त्याची मैत्रिण अनुष्का शर्मा यांच्यावर जोरदार टीका होत आहे. दोघांचे वैयक्तिक आयुष्य असून, त्यांच्या नात्याचा सन्मान करा, असे क्रिकेटपटू युवराजसिंग याने म्हटले आहे.
ट्विटरवर युवराजसिंगने म्हटले आहे की, 'ऑस्ट्रेलिया दौऱयादरम्यान विराटने पाचशेहून अधिक धावा केल्या आहेत. विराटचे भविष्य उज्वल असून, भारतीय क्रिकेट संघासाठी चांगली गोष्ट आहे. शिवाय, विराट व अनुष्का यांच्या वैयक्तिक नात्याबद्दल सन्मान करायला हवा, असे मला वाटते.'
भारताच्या पराभवानंतर फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सऍपवर विराट आणि अनुष्काच्या नावाने प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. नेटिझन्सनी त्यांना लक्ष केले आहे. वर्ल़्डकप २०११ मधील हिरो युवराजसिंग त्यांच्या बचावासाठी उतरला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.