मुंबई इंडियन्सला रोहितची कमतरता जाणवली – राइट

गेल्यावर्षीची चॅम्पियन मुंबई इंडियन्स टीमचा कॅप्टन रोहित शर्माच्या गैरहजेरीमध्ये वाईट सुरुवात झाल्यामुळं आम्ही लाहोर लायंस ‘चॅम्पियंस लीग टी-20’च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये हरलो असं, टीमचे कोच जॉन राइट यांनी म्हटलंय.

Updated: Sep 14, 2014, 08:18 PM IST
मुंबई इंडियन्सला रोहितची कमतरता जाणवली – राइट title=

रायपूर : गेल्यावर्षीची चॅम्पियन मुंबई इंडियन्स टीमचा कॅप्टन रोहित शर्माच्या गैरहजेरीमध्ये वाईट सुरुवात झाल्यामुळं आम्ही लाहोर लायंस ‘चॅम्पियंस लीग टी-20’च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये हरलो असं, टीमचे कोच जॉन राइट यांनी म्हटलंय.

पाकिस्तानी टीमकडून सहा विकेट्सनी पराभूत झाल्यानंतर मुंबई इंडियन्सचे कोच राइट यांनी प्रेस कॉन्फर्रेंस घेतली होती. त्यात त्यांनी सांगितले की, रोहित शर्मा हा जखमी झाल्यामुळे खेळू शकला नाही. सुरुवातीला आम्ही चांगले रन्स बनविण्याची गरज होती. पण आम्ही हळू सुरुवात केल्यामुळं स्कोअर बोर्डवर चांगले रन्स बनविण्यात यश आलं नाही.

लाहोर लायंसनं चांगली सुरुवात केली असून उमर अकमल यांनी 18 बॉल्समध्ये 38 रन्स केले. तो नॉट आउट होता. आम्ही 20 रन्सनं मागे होतो. आम्हाला अशा खेळाडूची गरज आहे की, जो मॅचमध्ये चांगले योगदान देऊ शकतो, असं राइट यावेळी म्हणाले.

उमर अकमल याला लवकरच आउट करण्याची गरज होती. कारण तो टी-20 मधील चांगल्या खेळाडूंमध्ये मोडतो. न्यूझीलॅंडच्या माजी कॅप्टननं एका मॅचसाठी टीममध्ये काही बदल केल्याच्या बातमीला खोटी असल्याचं सांगितलं आहे. यावर तो म्हणालं की, आम्ही एक किंवा दोन मॅचसाठी टीममध्ये बदल करत नाही. हा चांगला विकल्प असून यावर आम्ही विचार करून निर्णय घेऊ शकतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.