'वर्ल्डकप'मध्ये सलग चार शतक, संघकारानं रचला इतिहास

'वर्ल्डकप २०१५' मध्ये श्रीलंका आणि स्कॉटलंड दरम्यान सुरू असलेल्या सामन्यात श्रीलंकेचा बॅटसमन कुमार संघकारा यानं सचिनला करता आला नाही असा रेकॉर्ड करून दाखवलाय. 

Updated: Mar 11, 2015, 02:28 PM IST
'वर्ल्डकप'मध्ये सलग चार शतक, संघकारानं रचला इतिहास title=

होबार्ट  : 'वर्ल्डकप २०१५' मध्ये श्रीलंका आणि स्कॉटलंड दरम्यान सुरू असलेल्या सामन्यात श्रीलंकेचा बॅटसमन कुमार संघकारा यानं सचिनला करता आला नाही असा रेकॉर्ड करून दाखवलाय.  स्कॉटलंड विरूद्ध १२४ धावांची खेळी करून सलग चार वर्ल्ड कप सामन्यात शतक झळकावणारा पहिला बॅट्समन ठरला आहे. 

आजच्या मॅचमध्ये कुमार संघकारा आणि तिलकरत्न दिलशान यांनी शतक ठोकलंय. महत्त्वाचं म्हणजे, एकाच वर्ल्डकपमध्ये सलग चार मॅचेसमध्ये शतक ठोकरणारा कुमार संघकारा पहिला वहिला बॅटसमन ठरलाय. 

दिलशान ९९ बॉल्समध्ये १०४ रन्स करून बाद झाला. या शानदार खेळात त्यानं १० फोर आणि एक सिक्सरही ठोकला. दिलशाननं ९७ बॉल्समध्ये शतक ठोकलं. 

तर संघकारानं ८६ बॉल्समध्येच आपलं शतक पूर्ण केलं. त्यानं आपल्या शतकीय खेळीत आठ फोर आणि तीन सिक्सर ठोकले. संघकारानं वनडे क्रिकेटमध्ये आपली २५ वी सेन्चुरी पूर्ण केलीय. 

वर्ल्डकप २०१५ मध्ये संघकाराचे शानदार शतक

  • बांग्लादेशविरुद्ध १०५* रन्स

  • इंग्लंडविरुद्ध ११७* रन्स

  • ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०४ रन्स

  • स्कॉटलंड १२४ रन्स

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.