फिफा अंडर-१७ वर्ल्डकपसाठी कोलकाता असणार यजमान

पुढच्या वर्षी भारतात होणारा फिफा अंडर-17 वर्ल्ड कपसाठी कोलकात्यातील साल्ट लेक स्टेडियमला हिरवा कंदिल मिळाला आहे. फिफाच्या एका उच्चस्तरीय प्रतिनिधिमंडळाने मंगळवारी याला हिरवा कंदिल दिला.

Updated: Oct 25, 2016, 02:54 PM IST
फिफा अंडर-१७ वर्ल्डकपसाठी कोलकाता असणार यजमान title=

नवी दिल्ली : पुढच्या वर्षी भारतात होणारा फिफा अंडर-17 वर्ल्ड कपसाठी कोलकात्यातील साल्ट लेक स्टेडियमला हिरवा कंदिल मिळाला आहे. फिफाच्या एका उच्चस्तरीय प्रतिनिधिमंडळाने मंगळवारी याला हिरवा कंदिल दिला.

कोलकाता शिवाय कोच्ची, मुंबई ,गोवा, नवी दिल्ली आणि गुवाहाटीमध्ये सामने खेळले जाणार आहेत. फिफाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, 'पुढच्या वर्षी ६ ते २८ ऑक्टोबरदरम्यान भारतात फिफा वर्ल्डकप अंडर-17 होणार आहे. याचा ड्रा पुढच्या वर्षी ७ जुलैला होणार आहे. त्यांनी म्हटलं की मागच्या वेळेपेक्षा आता कोलकात्याच्या स्टेडियमवर भारताने खूप चांगलं काम केलं आहे. जो भारतातील चांगलं स्टेडिअम होऊ शकतं.'