...तर कोलकत्ता नाईटरायडर आयपीएल-८ मध्ये खेळणार नाही

आयपीएल-८ सुरू होण्यास काही दिवस शिल्लक आहेत. मात्र आयपीएलमध्ये एक नवा वाद निर्माण झाला आहे. आयपीएल-७ ची विजेता टीम कोलकत्ता नाइटरायडर्स आणि बीसीसीआय यांच्यात सुनील नारायणवरुन वाद निर्माण झाला आहे.

Updated: Apr 1, 2015, 06:05 PM IST
...तर कोलकत्ता नाईटरायडर आयपीएल-८ मध्ये खेळणार नाही title=

मुंबई : आयपीएल-८ सुरू होण्यास काही दिवस शिल्लक आहेत. मात्र आयपीएलमध्ये एक नवा वाद निर्माण झाला आहे. आयपीएल-७ ची विजेता टीम कोलकत्ता नाइटरायडर्स आणि बीसीसीआय यांच्यात सुनील नारायणवरुन वाद निर्माण झाला आहे.

मागिल वर्षी चॅम्पियन्स लिग ट्वेंटी-२० टुर्नामेंटमध्ये संशयास्पद बॉलिंग अॅक्शनबद्दल सुनिल नारायणवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे चेन्नई सुपरकिंग्स विरूद्ध फायनल मॅचमध्ये केकेआर ८ विकेट्सने पराभूत झाला होता.

नोव्हेंबरमध्ये जेव्हा वेस्ट इंडिजची टीम भारत दौऱ्यावर आली होती, त्यावेळी सुनिल नारायणचा टीममध्ये समावेश करण्यात आला नव्हता. त्यानंतर सुनिल नारायण स्वत:च वर्ल्ड कपमधून बाहेर झाला होता.

केकेआर बीसीसीआयविरूद्ध कायदेशीर पाऊन उचलण्याच्या तयारीत आहे. केकेआरचे म्हणणे आहे की, सुनिल नारायणच्या बॉलिंगवर संशय चॅम्पियन्स लिगमध्ये घेण्यात आला होता, आयपीएलमध्ये नाही. नारायणवरील बंदी हटवली नाही तर केकेआर आयपीएल-८ मध्ये सहभागी होणार नसल्याचे केकेआरकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.