पंजाबचा गुजरातवर २६ धावांनी विजय

किंग्ज इलेव्हन पंजाब आणि गुजरात लायन्स यांच्यात रंगलेल्या सामन्यात पंजाबने बाजी मारलीये. पंजाबने गुजरातवर २६ धावांनी विजय मिळवला. 

Updated: Apr 23, 2017, 08:18 PM IST
पंजाबचा गुजरातवर २६ धावांनी विजय title=

राजकोट : किंग्ज इलेव्हन पंजाब आणि गुजरात लायन्स यांच्यात रंगलेल्या सामन्यात पंजाबने बाजी मारलीये. पंजाबने गुजरातवर २६ धावांनी विजय मिळवला. 

हाशिम आमलाच्या ६५ धावांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर पंजाबने १८८ धावा केल्या होत्या. गुजरातसमोर विजयासाठी १८९ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते.

गुजरातच्या दिनेश कार्तिकने ५८ धावांची खेळी करताना संघाला विजय मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र त्याचे प्रयत्न अपुरे पडले. २६ धावांनी त्यांच्या संघाला पराभव पत्करावा लागला.