कोलंबो : श्रीलंकेचा क्रिकेटपटू कौशल सिल्वाला रविवारी सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान डोक्यावर चेंडू आदळल्याने दुखापत झाली.
सराव सामन्यात फॉरवर्ड शॉट लेगवर तो फिल्डिंग करत होता. यावेळी त्याच्या डोक्याला दुखापत झाली. त्यानंतर सिल्वाला एअर अॅम्ब्युलन्समधून कँडी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. स्कॅनिंगनंतर सिल्वाच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
विशेष म्हणजे सिल्वाने या सराव सामन्यातील पहिल्या दिवशी शतक ठोकले होते. यामुळे संघात परतण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. सिल्वा ऑक्टोबर २०१५मध्ये श्रीलंकेसाठी कसोटी क्रिकेट खेळला होता.