करुण नायरचे दीडशतक

करुण नायरच्या दीडशतकाच्या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीतील चौथ्या दिवशी पाचशेहून अधिक धावांची मजल मारलीये.

Updated: Dec 19, 2016, 01:11 PM IST
करुण नायरचे दीडशतक title=

चेन्नई : करुण नायरच्या दीडशतकाच्या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीतील चौथ्या दिवशी पाचशेहून अधिक धावांची मजल मारलीये.

करुण नायरने 241 चेंडूत आपले दीडशतक पूर्ण केले. सध्या मैदानावर करुण नायर आणि आर. अश्विन खेळत आहे. मोठी आघाडी घेण्याच्या दिशेने भारताने वाटचाल सुरु केलीये. 

याआधी तिसऱ्या दिवसअखेर भारताने चार गड्यांच्या मोबदल्यात 391 धावा केल्या होत्या. लोकेश राहुलचे केवळ एका धावेने द्विशतक हुकले.