४३ वर्षीय क्रिकेटरने बनविले दोन रेकॉर्ड

माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर जस्टिन लँगरने सोलारिसकेअरसाठी आयोजित निधी संकलन सामन्यात २ गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड तोडले. यातील एक रेकॉर्ड ४३ वर्षीय लँगरने इंग्लडचा माजी क्रिकेटर अँड्र्यू फ्लिन्टॉफ याचा आहे. 

Updated: Aug 1, 2014, 03:38 PM IST
४३ वर्षीय क्रिकेटरने बनविले दोन रेकॉर्ड  title=

मेलबर्न  : माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर जस्टिन लँगरने सोलारिसकेअरसाठी आयोजित निधी संकलन सामन्यात २ गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड तोडले. यातील एक रेकॉर्ड ४३ वर्षीय लँगरने इंग्लडचा माजी क्रिकेटर अँड्र्यू फ्लिन्टॉफ याचा आहे. 

या सामन्यात लँगरच्या गोलंदाजीसाठी लोकांनी रक्कम दिली. या मार्फत त्याने निधी संकलन केले. लँगरने ३८.८ सेकंदात क्रिकेट कीट परिधान करण्याचा नवा वर्ल्ड रेकॉर्ड बनविला. या पूर्वी एक क्रिकेट कीट परिधान करण्यासाठी ७८ सेकंदाचे वर्ल्ड रेकॉर्ड होते. यापूर्वीचा रेकॉर्ड फ्लिन्टॉफच्या नावावर होता. 

तसेच एका मिनिटात सर्वाधिक चेंडू खेळण्याचा रेकॉर्डही त्याने मोडला आहे. लँगरने एका मिनिटात २३ चेंडून खेळून काढले. यापूर्वी फ्लिन्टॉफने १९ चेंडू खेळून काढले होते. लँगरने याबाबत सांगितले की, फ्रेडी (फ्लिन्टॉफ) चा एक रेकॉर्ड मोडणे खूप शानदार अनुभव होता. त्याने माझ्या करिअरमध्ये सर्वाधिक त्रास दिला होता. माझ्या करिअरच्या शेवटी त्याने सर्वाधिक त्रास दिला होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.