लग्नाआधीच पिता होणार हा धडाकेबाज क्रिकेटर

इंग्लंड क्रिकेट टीमचा उपकर्णधार जो रुट भारतविरुद्ध होणाऱ्या वनडे सीरीजमध्ये सुरुवातीच्या मॅचमध्ये टीममध्ये नसणार आहे. जगातील उत्कृष्ट फलंदाजांच्या यादीत नाव असणारा जो रुट लवकरच पिता बनणार आहे. मात्र जो रुटने अजून विवाह केलेला नाही.

Updated: Jan 3, 2017, 10:23 AM IST
लग्नाआधीच पिता होणार हा धडाकेबाज क्रिकेटर title=

मुंबई : इंग्लंड क्रिकेट टीमचा उपकर्णधार जो रुट भारतविरुद्ध होणाऱ्या वनडे सीरीजमध्ये सुरुवातीच्या मॅचमध्ये टीममध्ये नसणार आहे. जगातील उत्कृष्ट फलंदाजांच्या यादीत नाव असणारा जो रुट लवकरच पिता बनणार आहे. मात्र जो रुटने अजून विवाह केलेला नाही.
 
भारताच्या विरोधात टेस्ट सीरीजमध्ये रुटने इंग्लंडकडून सर्वाधिक रन केले होते. त्यामुळे टीममध्ये त्याची अनुपस्थिती टीमला जाणवणार आहे. रूटचं म्हणणं आहे की, जोपर्यंत त्याची लाईफ पार्टनर बाळाला जन्म देत नाही तोपर्यंत तो तिच्यासोबत राहणार आहे. त्यामुळे वनडे सिरीजमध्ये तो नाही खेळणार आहे.

रूट आणि त्याची पार्टनर केरी कोटरेलचा साखरपुडा झाला आहे. रूट आणि केरी कोटरेल खूप दिवसांपासून एकमेकांनी डेट करत होते. त्यानंतर मार्च २०१५ मध्ये त्यांचा साखरपुडा झाला.

मागील वर्षी भारतात आयोजीत टी-ट्वेंटी वर्ल्डकआधी रूटने त्याची गर्लफ्रेंड केरीला प्रपोज केलं होतं.