धर्मशाला : ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी टेस्ट जिंकत भारतानं ही मालिकाही खिशात टाकली आहे. या टेस्ट मॅचबरोबरच १४ टेस्ट मॅचचा भारताचा हा मोसम संपला आहे. यंदाच्या या मोसमामध्ये भारताचा ऑल राऊंडर रवींद्र जडेजानं उल्लेखनीय कामगिरी करत नवं रेकॉर्ड केलं आहे.
या मोसमात जडेजानं ५०० पेक्षा जास्त रन आणि ५० हून अधिक विकेट घेतल्या आहेत. कपील देव आणि मिचेल जॉनसननंतर अशी कामगिरी करणारा जडेजा तिसरा खेळाडू ठरला आहे.
कपील देवनं हे रेकॉर्ड १९७९-८० मध्ये तर मिचेल जॉनसननं २००९-१०मध्ये हे रेकॉर्ड केलं होतं. जडेजानं या सिझनमध्ये १३ टेस्ट मॅचमध्ये ४२.७६ च्या सरासरीनं ५५६ रन बनवल्या आणि ६८ विकेट घेतल्या. आयसीसीच्या बॉलर्सच्या क्रमवारीमध्ये सध्या जडेजा पहिल्या क्रमांकावर आहे.