क्रिकेट सामन्यात बॉल लागून अंपायरचा मृत्यू

क्रिकेट मॅच दरम्यान अंपायरला बॉलचा फटका लागल्याने अंपायरचा जागीच मृत्यू झालाय, ही घटना इस्त्रायलमध्ये झाली.

Updated: Nov 30, 2014, 10:06 PM IST
क्रिकेट सामन्यात बॉल लागून अंपायरचा मृत्यू title=

मुंबई : क्रिकेट मॅच दरम्यान अंपायरला बॉलचा फटका लागल्याने अंपायरचा जागीच मृत्यू झालाय, ही घटना इस्त्रायलमध्ये झाली.

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिल ह्यूग्सच्या अपघाती मृत्यूची बातमी अद्याप ताजी असतानाच, एका अंपायरचाही चेंडू लागूनच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

हिलेल ऑस्कर असं या 55 वर्षीय अंपायरचं नावं आहे.अॅशडोडमधल्या बेन ग्युरियन पार्कमध्ये खेळवण्यात येत असलेल्या एका अॅमॅच्युअर लीगमध्ये शनिवारी ही घटना घडली. इस्त्रायलमधील एका क्रिकेट मॅच दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. 

 तो आघात इतका जबरदस्त होता, की ऑस्कर खाली कोसळले आणि तिथंच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. एका वेगवान गोलंदाजाचा चेंडू फलंदाजाना तितक्याच जोशानं फटकावला. तो चेंडू गोलंदाजाकडील यष्ट्यांना लागून ऑस्कर यांच्या छातीत आदळला. 

 खेळाडूंनी आणि एका वैद्यकीय सहाय्यकानं ऑस्कर यांना कृत्रिम श्वासोच्छवास देण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नांना थोडंसं यश आल्याचं चित्र दिसताच ऑस्कर यांना बारझिलाई रुग्णालयात हलवण्यात आलं. पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही,  आणि उपचारादरम्यानच त्यांचं निधन झालं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.