मुंबई : भारताचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजा येत्या १७ एप्रिलला रिवाबा सोलंकी हिच्याशी विवाहबद्ध होतोय. राजकोटमध्ये तीन दिवस त्याच्या लग्नाचा सोहळा असणार आहे. त्यांच्या लग्नापूर्वी जडेजाला रिवाबाचे व़डील म्हणजेच त्याच्या सासऱ्यांनी तब्बल ९७ लाखांची ऑडी क्यू७ गाडी भेट दिली.
या नव्या गाडीमुळे जडेजाची शान आता अधिकच वाढलीये. त्याने गाडीसोबत आपले आणि रिवाबाचे फोटोही शेअर केले. दरम्यान, या गिफ्टमुळे आता अनेक प्रश्न उपस्थित झालेत. अशआ प्रकारे सासरकडून इतकं महागडं गिफ्ट घेण योग्य आहे काय?...हा एक प्रकारचा हुंडा नाहीये का?
हुंडा म्हणजे लग्नात मुलीकडून मुलाला दिली जाणारी प्रॉपर्टी अथवा रक्कम होय. भारतात हुंडा घेणे अथवा देणे कायद्याने गुन्हा आहे. हे पाहता रिवाबाच्या वडिलांनी जडेजाला गाडी देणे म्हणजे हुंडा दिल्यासारखे नाही का?
पाच फेब्रुवारीमध्ये जडेजा-रिवाबाचा साखरपुडा झाला होता. रिवाबा मेकॅनिकल इंजीनियर असून सध्या ती यूपीएससीची परीक्षेच्या तयारीत व्यस्त आहे.