बंगळुरू : आयपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये शानदार फलंदाजी करणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली एक नवीन इतिहास बनविण्याचा फार जवळ पोहचला आहे.
आयपीएल ९ मध्ये चार शतक आणि सहा अर्धशतकांसह, ९१.९ च्या सरासरीने आणि १५२.४ च्या स्ट्राइक रेटने कोहलीने ९१९ धावा करून टॉपवर आहे. कोहली गुजरातच्या विरोधात शुन्यावर बाद झाला. तरीही आरसीबीने गुजरातला ४ विकेटने पराभूत केले.
कोहलीला या स्पर्धेत १ हजार धावा पूर्ण करण्यासाठी केवळ ८१ धावांची गरज आहे. कोहलीने असे केले तर टी-२० क्रिकेटच्या इतिहासात एखाद्या स्पर्धेत १ हजार धावा बनविणारा तो पहिला क्रिकेटर बनिणार आहे.
कोहलीच्या पूर्वी क्रिस गेल आणि मायकल हसी आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू होते. २०१२ मध्ये गेल आणि २०१३ मध्ये हसीने आयपीएलमध्ये सर्वाधिक ७३३ -७३३ धावा बनविल्या होत्या.
गेल्या पाच वर्षात आयपीएलमध्ये तोच संघ जिंकतो जो लीग मॅचेसमध्ये क्रमांक दोनवर आहे. अशात विराट कोहली कर्णधार असलेल्या रॉयल चॅलेंजर्सने बंगळुरू लीग मॅचेसमध्ये क्रमांक दोनवर होती. त्यामुळे पूर्व इतिहास पाहिला तर बंगळुरू विजेता होऊ शकते.
यंदा गुजरात लॉयन्स नऊ विजयासह १८ अंकासह प्रथम क्रमांकावर आहे. तर आरसीबी, केकेआर आणि हैदराबाद १६ अंकांनी अनुक्रमे २,३ आणि ४ स्थानावर आहे.