आयपीएल स्पॉट फिक्सिंग - अजित चंडिलावर आजीवन बंदी

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अजित चंडीलावर आजीवन बंदी तर हिकेश शाहवर पाच वर्षांची बंदी लादण्यात आलीय. बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीनं हा निर्णय दिलाय.

Updated: Jan 18, 2016, 05:56 PM IST
आयपीएल स्पॉट फिक्सिंग - अजित चंडिलावर आजीवन बंदी  title=

मुंबई : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अजित चंडीलावर आजीवन बंदी तर हिकेश शाहवर पाच वर्षांची बंदी लादण्यात आलीय. बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीनं हा निर्णय दिलाय.

 2013मध्ये स्पॉट फिक्सिंगमध्ये अजित चंडीलाला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात चंडीला हा प्रमुख आरोपी होता. 
 
 तर मुंबई रणजी टीमकडून खेळणा-या हिकेन शाहनं बीसीसीआय एंटी-करप्शन कोडचा भंग केल्याप्रकरणी त्याच्यावर पाच वर्षांची बंदी घालण्यात आलीय. 
 
 शशांक मनोहर अध्यक्ष असलेल्या शिस्तपालन समितीमध्ये ज्योतिरादीत्य सिंधिया आणि निरंजन शाह यांचा समावेश आहे.