आयपीएलमध्ये जेतेपदासाठी आज महामुकाबला

आयपीएलच्या नवव्या हंगामाचे जेतेपद जिंकण्यासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात मुकाबला रंगणार आहे. 

Updated: May 29, 2016, 11:43 AM IST
आयपीएलमध्ये जेतेपदासाठी आज महामुकाबला title=

मुंबई : आयपीएलच्या नवव्या हंगामाचे जेतेपद जिंकण्यासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात मुकाबला रंगणार आहे. 

कर्णधार विराट कोहलीचा संघ तिसऱ्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचलाय. यापूर्वी दोनवेळा फायनलमध्ये पोहोचून बंगळूरुला जेतेपद मिळवता आले नव्हते. त्यामुळे आजच्या सामन्यात बंगळूरु जेतेपदासाठी प्रयत्नशील असेल.

दुसरीकडे हैदराबाद सनरायजर्स संघ पहिल्यांदाच आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचलाय. त्यामुळे जेतेपदाच्या दृष्टीने हैदराबाद मैदानात उतरेल. 

बंगळूरुकडे मोठी ताकद आहे ती फलंदाजांची. आतापर्यंतच्या सामन्यात बंगळूरुने फलंदाजीच्या जोरावर सामने जिंकलेत. एबी डे विलियर्स आणि विराट कोहली सध्या तुफान फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्या आजच्या खेळावर चाहत्यांची नजर असेल.

तर हैदराबादची गोलंदाजी या सत्रात चांगली राहिली आहे. तसेच आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा बनवण्याच्या यादीत कोहलीनंतर दुसऱ्या स्थानी हैदराबादचा वॉर्नर आहे. त्यामुळे दोन्ही संघ तितकेच तुल्यबळ असल्याने आजचा सामना रंगतदार होणार आहे.