पाकिस्ताननं मोडला भारताचा वनडेमधला सर्वाधिक स्कोअरचा रेकॉर्ड

भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानात एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा सात वर्षापूर्वीचा रेकॉर्ड काल पाकिस्ताननं मोडला आहे. 

Updated: May 27, 2015, 03:05 PM IST
पाकिस्ताननं मोडला भारताचा वनडेमधला सर्वाधिक स्कोअरचा रेकॉर्ड title=

लाहोर: भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानात एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा सात वर्षापूर्वीचा रेकॉर्ड काल पाकिस्ताननं मोडला आहे. 

पाकिस्ताननं झिम्वाब्वेविरुद्ध लाहोरच्या गद्दाफी स्टेडिअममध्ये ३७५ धावा केल्या. पाकिस्तानमध्ये एकदिवसीय क्रिकेटमधील हा सर्वाधिक स्कोअर आहे. याआधी हा रेकॉर्ड भारताच्या नावे होता. भारतानं कराचीत हॉंगकॉंगविरुद्ध २००८मध्ये ३७४ धावा केल्या होत्या. 

याआधी पाकिस्तान टीमचा पाकिस्तानमध्ये ३५३ हा सर्वाधिक स्कोअर होता. जो त्यांनी इंग्लंडविरुद्ध २००५मध्ये कराचीत बनवला होता. पाकिस्तानच्या कालच्या सामन्यात त्याच्या पहिल्या चार खेळाडूंनी ७० पेक्षा जास्त रन केले. मोहम्मद हाफिजने ८६, अजहर अलीनं ७९, शोहेब मलिकने ११२ आणि हारिस सोहेलने नाबाद ८९ रन्स बनवले. 

एकदिवसीय क्रिकेटमधील पहिली वेळ आहे, ज्यात एका डावात चार खेळाडूंनी ७० पेक्षा जास्त रन केले. तर चार खेळाडूंनी ५० पेक्षा जास्त रन करण्याची ही एकदिवसीय क्रिकेटमधील ५०वी वेळ होती. 

पाकिस्तानचा हा एकदिवसीय सामन्यातील दुसरा सर्वोच्च स्कोअर आहे. बांगलादेशविरुद्धचा ३८५ हा पाकिस्तानचा सर्वोच्च स्कोअर आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.