गोल त्या फुटबॉलपटूच्या जीवावर बेतला

एका युवा भारतीय फुटबॉलपटूचा करूण अंत झाला.  गोल केल्यानंतर जल्लोष करण्याच्या नादात दुखापत झाल्याने  पीटर बियाक्सांगजुआलाचा मृत्यू झाला.  मिझोराममध्ये प्रिमीयर लीग सुरू आहे, यात ही घटना घडली. 

Updated: Oct 21, 2014, 07:23 PM IST
गोल त्या फुटबॉलपटूच्या जीवावर बेतला title=

ऍजॉल : एका युवा भारतीय फुटबॉलपटूचा करूण अंत झाला.  गोल केल्यानंतर जल्लोष करण्याच्या नादात दुखापत झाल्याने  पीटर बियाक्सांगजुआलाचा मृत्यू झाला.  मिझोराममध्ये प्रिमीयर लीग सुरू आहे, यात ही घटना घडली. 

पीटरच्या मणक्याला दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. स्थानिक फुटबॉल लीग सामन्यात बॅथलहम वेंगथलांग एफसी, आणि चानमारी वेस्ट एफसी यांच्या दरम्यान सामना सुरू होता. त्यावेळी पीटरने बॅथलहम वेंगथलांग एफसीकडून खेळताना चानमारी वेस्टवर गोल डागत बरोबरी साधली होती.
 
यानंतर पीटरने जल्लोष करत तो कोलांटउडी मारली. मात्र यावेळीच त्याच्या मणक्याला जबर दुखापत झाली. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मिझोरामच्या म्यामा सीमेजवळच्या चम्फाई जिल्ह्यातील पीटर हा रहिवाशी होता. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.