रिओ २०१६ हॉकी - ३६ वर्षांनंतर भारत ऑलिम्पिकच्या क्वार्टरमध्ये

 भारताने मंगळवारी रिओ ऑलिम्पिकच्या हॉकी स्पर्धेत आपल्या तिसऱ्या पूल मॅचमध्ये अर्जंटिनाला २-१ने नमवले. २००९ नंतर पहिल्यांदा भारताने अर्जंटिनाला हरविले आहे. 

Updated: Aug 9, 2016, 11:04 PM IST
 रिओ २०१६ हॉकी - ३६ वर्षांनंतर भारत ऑलिम्पिकच्या क्वार्टरमध्ये  title=

रिओ द जनेरो :  भारताने मंगळवारी रिओ ऑलिम्पिकच्या हॉकी स्पर्धेत आपल्या तिसऱ्या पूल मॅचमध्ये अर्जंटिनाला २-१ने नमवले. २००९ नंतर पहिल्यांदा भारताने अर्जंटिनाला हरविले आहे. 

या विजयासह भारत १९८० नंतर पहिल्यांदा ऑलिम्पिकच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. 

ऑलिम्पिक हॉकी सेंटरच्या टर्फवर खेळण्यात आलेल्या सामन्यात पूल बीमधून भारताच्या चिंगलेनसाना कांगुजाम याने आठव्या आणि कोथाजीत सिंग खादानबाम यांनी ३५ मिनिटाला गोल केले. 

अर्जंटिनाने केवळ एक गोल गोंजालो पिलाट याने ४९ मिनिटाला केला.