भारतीय क्रिकेटपटूला विकाव्या लागतायत कचोऱ्या

२००५मध्ये झालेल्या अपंगांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताला विश्वचषक मिळवून देणाऱ्या इमरान शेख या क्रिकेटपटूला कचोऱ्या विकून गुजराण करावी लागतेय. ३० वर्षीय इमरानने या विश्वचषकात तब्बल तीन अर्धशतके लगावताना भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. भारताचा झेंडा रोवणाऱ्या या क्रिकेटपटूला मात्र आपल्या कुटुंबासाठी सध्या कचोऱ्या विकण्याचा व्यवसाय करावा लागतोय. आठवड्यापूर्वीच त्याने या व्यवसायाला सुरुवात केली. 

Updated: Nov 28, 2015, 04:58 PM IST
भारतीय क्रिकेटपटूला विकाव्या लागतायत कचोऱ्या title=

नवी दिल्ली : २००५मध्ये झालेल्या अपंगांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताला विश्वचषक मिळवून देणाऱ्या इमरान शेख या क्रिकेटपटूला कचोऱ्या विकून गुजराण करावी लागतेय. ३० वर्षीय इमरानने या विश्वचषकात तब्बल तीन अर्धशतके लगावताना भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. भारताचा झेंडा रोवणाऱ्या या क्रिकेटपटूला मात्र आपल्या कुटुंबासाठी सध्या कचोऱ्या विकण्याचा व्यवसाय करावा लागतोय. आठवड्यापूर्वीच त्याने या व्यवसायाला सुरुवात केली. 

क्रिकेट माझे पॅशन आहे. मात्र घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मला हा व्यवसाय करावा लागतोय असे इमरानने सांगितले. त्याच्या या व्यवसायात इमरानची पत्नीही त्याला मदत करते. 

इमरानने आशिया चषक स्पर्धेतही भारताचे नेतृत्व केले होते. २००५मधील विश्वचषक स्पर्धेत इमरानने नेपाळविरुद्ध ७० धावांची खेळी केली होती. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध त्याने ६० धावा केल्या. सेमीफायनलमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने ६२ धावांची खेळी रचली. अंतिम सामन्यातही त्याने ४० धावा आणि तीन विकेट घेत भारताला विश्वचषक जिंकून दिला. या गुणवान क्रिकेटपटूला मात्र कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे क्रिकेट सोडून कचोऱ्या विकण्याचा व्यवसाय करावाा लागतोय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.