भारतानं किवींना चिरडलं, सीरिजही टाकली खिशात

कोलकता टेस्टमध्ये भारतानं न्यूझीलंडचा तब्बल 178 रननी पराभव केला आहे.

Updated: Oct 3, 2016, 05:01 PM IST
भारतानं किवींना चिरडलं, सीरिजही टाकली खिशात title=

कोलकाता : कोलकता टेस्टमध्ये भारतानं न्यूझीलंडचा तब्बल 178 रननी पराभव केला आहे. याबरोबरच भारतानं ही मालिकाही 2-0नं खिशात टाकली आहे. 376 रनचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव 197 रनवर आटोपला.

भारताकडून अश्विन, जडेजा आणि शामीनं प्रत्येकी तीन विकेट घेतल्या तर भुवनेश्वर कुमारला एक विकेट मिळाली. या विजयामुळे भारत आयसीसीच्या टेस्ट रॅकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

भारताची न्यूझीलंडविरुद्धची तिसरी टेस्ट शनिवारी 8 ऑक्टोबरपासून इंदोरमध्ये सुरु होईल. न्यूझीलंडला व्हाईट वॉश करण्यासाठी इंदोरच्या होळकर स्टेडियमध्ये भारतीय संघ उतरेल.