ऑस्ट्रेलिया व्हाईटवॉश, भारतानं घेतला वनडेतल्या पराभवाचा बदला

ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी टी-20 जिंकत भारतानं ही मालिकाही 3-0नं खिशात घातली आहे. वनडे सीरिजमध्ये4-1नं झालेल्या पराभवाचाही भारतानं बदला घेतला आहे. 

Updated: Jan 31, 2016, 05:38 PM IST
ऑस्ट्रेलिया व्हाईटवॉश, भारतानं घेतला वनडेतल्या पराभवाचा बदला title=

सिडनी: ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी टी-20 जिंकत भारतानं ही मालिकाही 3-0नं खिशात घातली आहे. वनडे सीरिजमध्ये4-1नं झालेल्या पराभवाचाही भारतानं बदला घेतला आहे. 
सिडनीमधल्या भारताच्या या विजयाचे शिल्पकार ठरले ते रोहित, कोहली आणि रैना. 198 रनचा पाठलाग करताना रोहितनं 38 बॉलमध्ये 52 रन केल्या. तर कोहलीनं 36 बॉलमध्ये 50 रनची खेळी केली. सुरेश रैनानंही 196 च्या स्ट्राईक रेटनं 25 बॉलमध्ये 49 रन केल्या. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करणाऱ्या युवराज सिंगनंही संधीचा चांगलाच फायदा उचलला. शेवटच्या ओव्हरला 17 रनची आवश्यकता असताना स्ट्राईकवर असणाऱ्या युवराजनं टायला आधी फोर आणि मग सिक्स मारून भारताला विजयाच्या आणखी जवळ नेलं. आणि मग रैनानं शेवटच्या बॉलला फोर मारून भारताचा विजय निश्चित केला. 

त्याआधी टॉस जिंकून ऑस्ट्रेलियानं पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि 20 ओव्हरमध्ये 197 रनचा डोंगर उभा केला. यामध्ये मोलाचा वाटा उचलला तो कॅप्टन शेन वॉटसननं. त्यानं 71 बॉलमध्ये 124 रनची खेळी केली, ज्यात 10 फोर आणि 6 सिक्सचा समावेश होता. 

भारतात होणारा टी-20 वर्ल्ड कप आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यातच भारतानं ऑस्ट्रेलियाचा 3-0नं पराभव केला आहे. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावयला या विजयाची नक्कीच मदत होईल, तर तिकडे या दारुण पराभवामुळे ऑस्ट्रेलियाच्या चिंता मात्र वाढणार आहेत.