भारतीय संघ वनडे मालिकेत विजयी आघाडी घेणार?

टीम इंडिया आणि इंग्लंडमधील दुसरी वनडे आज कटकमध्ये रंगणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्याच्या इराद्यानेच कोहली सेना मैदानात उतरेल. 

Updated: Jan 19, 2017, 07:40 AM IST
भारतीय संघ वनडे मालिकेत विजयी आघाडी घेणार? title=

कटक : टीम इंडिया आणि इंग्लंडमधील दुसरी वनडे आज कटकमध्ये रंगणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्याच्या इराद्यानेच कोहली सेना मैदानात उतरेल. 

पहिल्या वनडेत तीन विकेट्स राखून भारताने इंग्लंडचा धुव्वा उडवला होता. या सामन्यात कर्णधार कोहली आणि केदार जाधवच्या शतकी खेळीने भारताचा हा विजय सुकर केला होता. 

आता दुस-या वनडेत क्रिकेट फॅन्सच्या नजरा या दोघांकडे असतील. याशिवाय ओपनर्सच्या कामगिरीकडेही फॅन्सचं लक्ष असेल. तर दुसरीकडे सिरीजमध्ये कमबॅक करण्याच्या इराद्याने इंग्लिश आर्मी कटकच्या मैदानात उतरेल.

सामन्याची वेळ : दुपारी दीड वाजता.